Bacchu Kadu Slaps Cook : धान्यात अफरातफर झाल्याने बच्चू कडू आक्रमक, स्वयंपाक्याच्या कानशीलात लगावली
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअकोला : राज्यमंत्री बच्चू कडू.. राज्यभरात बच्चू कडूंची ओळख ही 'आंदोलक' अन् 'डॅशिंग' राजकारणी अशी. त्यांच्या कामाची पद्धतही राजकुमारच्या एका चित्रपटातील डायलॉग सारखी. "पहिले बात, फिर मुलाकात और बाद मे सिधी लात" अशी. त्यांनी आपल्या 'प्रहार' संघटनेच्या माध्यमातून केलेली आंदोलनं राज्य अन् देशभरात गाजलीत. सोबतच त्यांनी अनेकदा अधिकारी- कर्मचाऱ्यांना आपल्या 'जादूच्या झप्पी'चा 'प्रसाद'ही दिला. मात्र, आक्रमक अन् लढवय्ये बच्चूभाऊ तीन पक्षांच्या 'महाआघाडी' सरकारमध्ये राज्यमंत्री झालेत अन् 'प्रोटोकॉल'च्या धबडग्यात बच्चूभाऊचा 'झप्पी'वाला अवतार महाराष्ट्रानं अनेक दिवसांपासून पाहिला नव्हता. मात्र, काल अकोला जिल्हा रूग्णालयात बच्चूभाऊंना मेसचा कारभार पाहून संताप आला अन् रागावलेल्या बच्चूभाऊंनी थेट कंत्राटी स्वयंपाक्याच्या कानशीलात लगावली. या प्रकारानंतर गेल्या कित्येक दिवसानंतर जनतेला बच्चू कडू यांच्यामधला जूना आक्रमक बच्चू कडू दिसल्याची प्रतिक्रिया लोकांमध्ये उमटतांना दिसते आहे.