18 वर्षांवरील सर्व व्यक्तींना लस देण्याची परवानगी द्या, देशातील कोरोना परिस्थितीवरून IMA ची मागणी
कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक राज्यात वाढत असताना कोरोना या आजाराविरोधातील एकमेव शस्त्र 'लस' अनेकांना हवी आहे. मात्र वयाची अट असल्यामुळे अनेक तरुणांना लस घेताना अडचणी येतात. सध्याची परिस्थिती पाहता मोठ्या प्रमाणात तरुणांना कोरोनाची बाधा होत आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णाच्या 60 टक्के रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लस राज्यातील जनतेला मिळणे अपेक्षित आहे. सध्या या वयोगटात कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण आढळून येत आहे त्यामध्ये तरुण आणि चिमुकल्यांचा समावेश अधिक असल्याचे दिसून आलं आहे.