Nashik Protest | Sanjay Raut यांचा फडणवीसांना इशारा, शिवसेना-मनसेचा विराट मोर्चा
नाशिकमध्ये होणाऱ्या मोर्चाचा टीजर प्रदर्शित झाला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आजच्या मोर्चासंदर्भात ट्वीट केले आहे. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना उद्देशून नाशिकमधील परिस्थितीवर भाष्य केले. नाशिक महानगरपालिकेतील भ्रष्टाचारामुळे शहर बकाल झाले असून, गुंडगिरी आणि भ्रष्टाचार बोकाळला आहे, असे राऊत म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतले असले तरी, परिस्थिती सुधारली नाही. संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षाच्या नेत्यांसह एकदा नाशिकमध्ये फिरून येथील अवस्था पाहण्याचे आवाहन केले. नाशिकमधील अराजकाविरोधात शिवसेनेने यापूर्वीही आंदोलने केली आहेत. आता शिवसेना आणि मनसे यांनी एकत्र येऊन एक विराट जनआक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून सरकारचे लक्ष वेधले जाईल. "लोकांच्या संतापाचा स्फोट झाला की काय होतं हे नेपाळमध्ये आम्ही पाहिलंय. राज्य सरकारनं रस्त्यावरते आणून मारलंय, अधिकाऱ्यांना रस्त्यावरते आणून मारलंय. हे या राज्यात आणि देशात होऊ नये," असे राऊत म्हणाले. नाशिकमध्ये सहनशीलतेचा अंत झाला असून, पुण्यामध्येही अशीच परिस्थिती आहे. नाशिकनंतर पुण्यासह इतर शहरांमध्येही असे मोर्चे काढले जातील, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.