Ajit Pawar Pawar's Warning: 'कोणाच्याही भरवशावरती राहू नका', Ajit Pawar यांचा आमदारांना सज्जड दम
Continues below advertisement
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) आमदारांची बैठक घेऊन त्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. 'कोणाच्याही भरवशावरती राहू नका, स्वतःच्या ताकदीवर निवडणुका लढवण्यासाठी तयार राहा,' अशा स्पष्ट शब्दात त्यांनी आमदारांना बजावले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर (Local Body Elections) पक्षाची ताकद दाखवून देण्याचे आवाहनही त्यांनी केले. अनेक आमदार सतत मुंबईत फिरत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करत, त्यांनी सर्वांना आपापल्या मतदारसंघात राहून काम करण्याचे आदेश दिले. तसेच, संपर्कमंत्री नेमून दिलेल्या जिल्ह्यांमध्ये योग्य प्रकारे काम करत नसल्याबद्दल, 'पन्नास टक्के संपर्कमंत्री काम करत नाहीत', अशी खंतही अजित पवार यांनी या बैठकीत व्यक्त केली. या सूचनांमुळे पक्षांतर्गत शिस्त लावण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येत आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement