Raju Bakane Farmer Protest: 'कर्जमाफीसाठी मुद्दा लावून धरेन', BJP आमदार आंदोलकांच्या गराड्यात
Continues below advertisement
शेतकरी कर्जमुक्तीसाठी (Farm Loan Waiver) प्रहार नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या नेतृत्वात नागपुरात (Nagpur) झालेल्या आंदोलनात भाजप आमदार राजू बकाने (Raju Bakane) अडकले. आंदोलकांनी घेरल्यानंतर, 'शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे आणि येत्या अधिवेशनामध्ये हा मुद्दा मी लावून धरेन,' असे आश्वासन आमदार बकाने यांनी दिले. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी आणि प्रहार कार्यकर्त्यांनी नागपूर-हैदराबाद महामार्ग (Nagpur-Hyderabad Highway) आणि समृद्धी महामार्गाकडे (Samruddhi Mahamarg) जाणारा रस्ता रोखून धरला. याच आंदोलनात देवरी मतदारसंघाचे भाजप आमदार राजू बकाने यांची गाडी अडकली. ते गाडी सोडून निसटण्याचा प्रयत्न करत असताना कार्यकर्त्यांनी त्यांना ओळखले आणि बच्चू कडू यांच्यासोबत आंदोलनस्थळी बसवले. सुमारे चार तास आमदार बकाने कार्यकर्त्यांच्या गराड्यात होते.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement