Ajit Pawar on Marathwada Daura : अतिवृष्टीने हाहाकार, पाहणी दौऱ्यानंतर अजित पवार काय म्हणाले....

Continues below advertisement
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातून पाहणी दौऱ्याला सुरुवात केली. करमाळा, माढा, मोहोळ, तुळजापूर, भूम आणि परांडा या तालुक्यांमध्ये त्यांनी नुकसानीची पाहणी केली. नदीकाठ, ओढे, नाले आणि शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. ओढे आणि नाले पूर्वीच्या तुलनेत लहान झाल्याने तसेच नद्यांनी पात्र बदलल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याने या आठवड्यात पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. "विशेषतः सत्तावीस ते एकोणतीस तीस हे तीन चार दिवस फार धोक्याचे असू शकतात किंवा अतिवृष्टी होऊ शकते," असे सांगण्यात आले आहे. यावर सर्वांनाच काळजी घ्यावी लागेल, असे पवारांनी नमूद केले. सरकार म्हणूनही काळजी घेतली जाईल. उद्यापासून नुकसानीचे पंचनामे सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे व्यवस्थित पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. जनतेला या संकटातून बाहेर काढण्यासाठी बांधावर जाऊन पाहणी करण्याचे काम आज पूर्ण केले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola