Ajit Pawar : माझ्याकडे अर्थखातं आहे, त्यामुळे आपल्याला झुकतं माप : अजित पवार
अजित पवार गट सत्तेत आल्यावर सर्वाधिक राजकारण घडलं ते अर्थ खात्यावरून. आधी देवेंद्र फडणवीसांकडे असलेलं अर्थ खातं अजित पवारांना देण्यात आलं. मात्र आता हेच अर्थ खातं आपल्याकडे राहील की नाही माहीत नाही अशा आशयाचं विधान खुद्द अजितदादांनी केलं. बारामतीत ते एका कार्यक्रमात बोलत होते. तेव्हा त्यांनी केलेल्या या विधानामुळे उपस्थित सर्वांच्याच भुवया उंचावल्या.