Hindi schools |पाचवीपासून हिंदी शिकवावी, अजित पवारांचं मत महायुतीत वेगळा सूर
अजित पवार यांनी पाचवीपासून हिंदी भाषा शिकवावी असे मत व्यक्त केले. मंत्रिमंडळ बैठकीत हिंदीच्या निर्णयासंदर्भात चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोणताही नेता 5 जुलैला होणाऱ्या मोर्चात सहभागी होणार नसल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.