Ajit Pawar Speech Mumbai Coastal Road : कोस्टल रोडला मुंबईकरांना एक रुपयाही टोल द्यावा लागणार नाही
abp majha web team
Updated at:
11 Mar 2024 12:46 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAjit Pawar Speech Mumbai Coastal Road : कोस्टल रोडला मुंबईकरांना एक रुपयाही टोल द्यावा लागणार नाही
मुंबईकरांसाठी आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. याचं कारण म्हणजे वरळी ते मरीन ड्राईव्ह कोस्टल रोडचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही यावेळी उपस्थित होते. कोस्टल रोडमुळे वरळी ते मरीन ड्राईव्ह अंतर प्रवास अवघ्या १० मिनिटांत पार करता येणार आहे. येत्या काही दिवसांत कोस्टल रोड हा वांद्रे वरळी सी लिंकला देखील जोडण्यात येणार आहे. हा जोडरस्ता पूर्ण झाल्यावर मरीन ड्राईव्हवरून थेट वांद्रेमध्ये उतरणं शक्य होणार आहे.