ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10AM 11 March 2024

Continues below advertisement

लोकसभा निवडणुकीआधी अजित पवार गटाला धक्का, पारनेरचे आमदार निलेश लंके शरद पवार गटात प्रवेश करणार 

मुंबईतल्या बहुचर्चित कोस्टल रोडचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण, वरळी ते मरीन ड्राईव्ह अंतर अवघ्या १० मिनिटांत पार करता येणार

राज्य मंत्रिमंडळाची आज आणि उद्या बैठक, आचारसंहिता लागण्याआधी शेकडो प्रकल्पांना मान्यता मिळण्याची शक्यता, महालक्ष्मी रेसकोर्समधील थीम पार्कचा देखील समावेश

केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक.. राज्यांचे निवडणूक निरीक्षक बैठकीला उपस्थित राहणार..

निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांच्या राजीनाम्याचं गूढ काय?, सामनाच्या आग्रलेखातून मोदी सरकारला सवाल.. तर मोदी राजवटीतील उत्तरं न मिळालेल्या प्रश्नांची यादी न संपणारी.. सामनातून टीका

नवी दिल्लीत आज महाराष्ट्राचं जागावाटप ठरणार, भाजप केंद्रीय निवडणूक समितीची आज संध्याकाळी बैठक, तर महायुतीच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री शिंदे आणि प्रफुल्ल पटेलही दिल्लीत जाणार 

नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीत मोठ्या हालचाली, स्वामी शांतिगिरी महाराजांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram