Ajit Pawar Speech : तुमची साध हवी...शरद पवारांसमोर दादांची बारामतीकरांना साद UNCUT भाषण
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबारामती :मी फुशारकी मारत नाही, पण बारामतीतील प्रत्येक इमारत बांधून पूर्ण होईपर्यंत मी चाळीस- चाळीस वेळा भेटी दिल्या. करायचं तर एक नंबर करायचं नाहीतर आपण त्याच्या नादाला लागत नाही. राज्यातील विकासकामे करताना मी मनापासून ती कामे करतो. बारामतीला राज्यातील सर्वात विकसित तालुका करायचा असून त्यासाठी आपली साथ हवी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नमो मेळाव्यातून केले. बारामतीत 'नमो महारोजगार मेळावा' आयोजित करण्यात आला आहे. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री उदय सामंत, शरद पवार, सुप्रिया सुळे, आमदार दत्ता भरणे उपस्थित होते. ज्या विद्यार्थ्यांनी या रोजगार मेळाव्यासाठी नावनोंदणी केली ते सर्वजण यावेळी उपस्थित होते.