Ajit Pawar Full Speech : कोंबडं कितीही झाकलं तरी...जयंतरावांच्या बालेकिल्ल्यात दादा गरजले ABP MAJHA

Continues below advertisement

Ajit Pawar Full Speech : कोंबडं कितीही झाकलं तरी...जयंतरावांच्या बालेकिल्ल्यात दादा गरजले ABP MAJHA
निशिकांत पाटील यांच्यासारखे युवा नेतृत्व आज विधानसभेत आमच्या घड्याळ चिन्हावर उभा राहिलेय क्रांतीचा तालुका, जिल्हा म्हणून या भागाची ओळख आहे या भागाने आजपर्यंत काँग्रेसच्या विचारधारेवर प्रेम केलं सर्व जातीमध्ये सलोखा ठेवून आम्ही राजकारण करतोय  जाती जातीत ते निर्माण करून कुणाचाही विकास होऊ शकत नाही इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात  निशिकांत पाटील मोठ्या मताधिक्याने विजय होतील इस्लामपूरकर मतदार आतापर्यंत घड्याळला मतदान करत आलेत आताही घड्याळालाच मतदान करा.. घड्याळ घड्याळ घड्याळ महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आणायचं असेल तर जिथे घड्याळ असेल ते घड्याळ धनुष्यबाण असेल धनुष्यबाण आणि कमळ असेल तर कमळ असलेले उमेदवार विजयी केले पाहिजेत केंद्र सरकारमध्ये सत्तेत असलेल्या लोकांचे राज्यात सरकार आले तर त्या राज्याचे भले होईल महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीचं सरकार आलं पाहिजे लोकसभा निवडणुकीत संविधान बदलण्याच्या एका नेरेटिव्ह  मुळे आम्हाला मोठी किंमत मोजावी लागली संविधानामुळे भारत देश एकसंघ बांधला गेला आहे आम्ही सत्तेला हापापलेलो नाही,  कुणीही ताम्रपट घेऊन आले नाही. मतदार राजाच हातात कुणाचं सरकार आणायचं कुणाचं घालवायचं हातात आहे जयंत पाटील यांच्या प्रसिद्ध डायलॉग असलेल्या करेक्ट कार्यक्रमाच्या डायलॉग वरून अजित पवार यांनी जयंत पाटील यांना डिवचले आम्ही कुणाचा करेक्ट कार्यक्रम करत नाही करेक्ट कार्यक्रमाने तरुण-तरुण रोजगार मिळणार नाही लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत  मतदारसंघातील प्रश्न सुटणार नाहीत काय  करेक्ट कार्यक्रम करतो करेक्ट कार्यक्रम करणे  माझ्याही हातात नाही आणि त्याच्याही हातात नाही लाडकी बहीण मुळे महिलांना होणारा आनंद विरोधकांना सहन होत नाही त्यामुळे काही विरोधक लाडकी बहीण योजनेच्या विरोधात कोर्टात गेलेत लाडकी बहीण योजनेला स्टे आला,  स्टे कुठे आला  ते दाखवा अजित पवार यांचे लाडके बहीण योजनेवरून विरोधकांना आव्हान विरोधकांना आता मुद्दा राहिलेला नाही  मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाव असलेल्या वरून अजित पवार यांनी जयंत पाटलांना  डिवचले इस्लामपूर मतदारसंघांमध्ये  मागील आठवड्यात एक सभा झाली त्या सभेमध्ये वाळवा मतदारसंघाकडे मुख्यमंत्रीपद येणार असे अप्रत्यक्षपणे सांगितले गेले... या सगळया थापा आहेत जेव्हा जास्त जागा येऊन मुख्यमंत्री पद घेत नव्हता तेव्हा आता कसं घेणार लबाडा घरचा आवाज जेवल्याशिवाय जायचं नाही मुख्यमंत्री पद वगैरे सगळे खोटा आहे,  काहीही देणार नाहीत  राजारामबापूनी उभ्या केलेल्या संस्थांमध्ये नंतर जयंत पाटील यांनी काय केलं? त्या संस्था योग्य पद्धतीने वाढवल्या का त्याचा लोकांना फायदा झाला का?  असला मुख्यमंत्री करायचा का? आपल्यापुढे जाणाऱ्याला जिरवण्याचे काम इथे केलं गेलं  आता वाळव्यात परिवर्तन अटळ आहे  काही लोकांचा सांगली जिल्ह्यात नाही  तर सातारा जिल्ह्यात देखील अनेकांना त्रास होतोय इस्लामपूर मधील सभेतच आर आर यांना तंबाखू खाऊ नका असं म्हटलं होतं,  पण आर आर याना मी बोललेले वाईट वाटलं होतं कुणाच्या खोड्या काय कशा आहेत हे मला माहीत आहे वाळवेकरांना  सुट्टीवर पाठवायला  चांगली संधी आली आहे परिवर्तन अटळ आहे पण तुमच्यात फूट पडू देऊ नका फूट पाडण्यात माणूस तरबेज आहे, इस्लामपूरची बारामती करतो असं 2009 पासून सांगतोय सात वेळा संधी दिली पण त्या बाबांने काही बारामती केली नाही, आपले बाराच वाजवलेत यावेळी निशिकांत पाटील यांना संधी द्या बारामती पेक्षा चांगले शहर बनू

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram