Ajit Pawar Full Speech Baramati : बारामतीत पहिलं भाषण, हुंदका दाटला, डोळे भरले, दादांचं UNCUT भाषण

Continues below advertisement

Ajit Pawar Full Speech Baramati : बारामतीत पहिलं भाषण, हुंदका दाटला, डोळे भरले, दादांचं UNCUT भाषण
Ajit Pawar: पुणे : राज्याचं लक्ष लागेल्लया बारामती मतदारसंघात यंदा पवार विरुद्ध पवार असाच सामना होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरुद्ध त्यांचा सख्खा पुतण्या युगेंद्र पवार त्यांच्याविरुद्ध बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. त्यामुळे, बारामतीमधील निवडणुकीत चांगलीच चूरस वाढली आहे. लोकसभा निवडणुकीतही बारामतीमध्ये (Baramati) पवार कुटुंबातच लढत झाली होती. नणंद विरुद्ध भावजय अशी लढत महाराष्ट्राने पाहिली, त्यामध्ये सुप्रिया सुळे एक लाखांपेक्षा अधिक मताधिक्य घेऊन विजयी झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नेमकं काय होणार, काका-पुतण्याच्या लढाईत काका जिंकणार की पुतण्या, अशी चर्चा मतदारसंघात होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी (Ajit pawar) आज उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बारामतीकरांना उद्देशून भाषण केलं. यावेळी, अजित पवारांनी त्यांच्यास्टाईलने फटकेबाजी केली, तसेच ते भावूक झाल्याचंही दिसून आलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram