Ajit Pawar : गृहमंत्रिपदाच्या जबाबदारीमुळं जयंत पाटलांचा बीपी वाढतो,अजित पवार यांची टोलेबाजी

Continues below advertisement

अनिल देशमुखांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर जयंत पाटलांना गृहमंत्री पद घ्या असं मी म्हणालो होतो. पण ते म्हणाले नको गृह विभागामुळं माझा बीपी वाढतो. त्यामुळे दिलीप वळसे पाटलांकडे ते खातं गेलं. पण तुमचं तसं होऊ नये उलट तुमच्या सर्व व्याधी या गृह विभागामुळं जावोत, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली. अर्थात हे म्हणताना त्यांचा सूर मिश्किलपणाचा होता, म्हणूनच त्यांनी पत्रकारांना हे ऑफ दि रेकॉर्ड आहे असं सूचित केलं. नाहीतर तुम्ही ब्रेकिंग न्यूज कराल आणि जयंतराव म्हणतील अजित तू काहीही सांगत बसतो, असं म्हणतात उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. अजित पवार हे दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघातील घोडेगावमध्ये बोलत होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram