Ajit Pawar On MLA : अजित पवारांचे आमदारांना खडे बोल, पक्षाची ताकद दाखवा, मुंबईत फिरू नका

Continues below advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला असून अजित पवार (Ajit Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) हे नेते आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आहेत. 'पन्नास टक्केच संपर्कमंत्री काम करत नाहीत,' अशा शब्दांत अजित पवार यांनी आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांच्या कामगिरीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईत अकारण न फिरता आपापल्या मतदारसंघात काम करण्याच्या सूचना त्यांनी आमदारांना दिल्या. दुसरीकडे, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी (BMC Elections) ठाकरे गटाने नवी रणनीती आखली असून, ६० वर्षांवरील नेत्यांऐवजी सुमारे ७० टक्के नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचे संकेत दिले आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात युतीच्या घोषणेची प्रतीक्षा असताना, जागावाटपासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये संयुक्त बैठका झाल्याचे समोर आले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola