Bacchu Kadu Farmers Protest : 'सरकारनं दारं बंद केली', बच्चू कडूंनी दिला रेल्वे रोकोचा इशारा
Continues below advertisement
आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या नेतृत्वाखाली नागपूरमध्ये (Nagpur) शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers Protest) अधिक तीव्र झाले असून, महामार्ग रोखल्यानंतर आता 'रेल रोको'चा (Rail Roko) इशारा देण्यात आला आहे. 'सरकारला शेतकऱ्यांना रस्त्यावर गोळ्या घालून मारायचं असेल तर आम्ही गोळ्याही खायला तयार आहोत,' असा थेट इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. आम्ही चर्चेची दारे बंद केलेली नाहीत, पण सरकारनेच ती बंद केली आहेत, असेही ते म्हणाले. आंदोलनाच्या दिवशीच मुंबईत बैठकीसाठी बोलावणे हा अटक करण्याचा भाजपचा (BJP) डाव होता, असा गंभीर आरोपही कडू यांनी केला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही आणि हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर पसरेल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement