Ajit Pawar on Shekhar Bagade : शेखर बागडेंना कोण पाठीशी घालतंय? शिंदेंचं नाव न घेता दादांचा सवाल

Continues below advertisement

आता बातमी, अजितदादांनी भाजपच्या सुरात सूर लावत, एकनाथ शिंदेंवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेची... प्रकरण आहे ठाण्याचं... पोलीस निरीक्षक शेखर बागडेंवरून आधीच शिवसेना आणि महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे आणि भाजपमध्ये वाद सुरू झालाय. श्रीकांत शिंदेंनी तर मिठाचा खडा वगैरे शब्द वापरत खासदारकी सोडण्याचाही इशारा दिला होता. भाजपचे पदाधिकारी नंदू जोशींवर शेखर बागडेंनी गुन्हा दाखल केल्याने त्यांची बदली करण्याची भाजपची मागणी आहे, मात्र, त्यांना एकनाथ शिंदे पाठीशी घालत असल्याचं भाजपचं म्हणणं आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनीही भाजपच्या सुरात सूर लावत, शेखर बागडेंच्या संपत्तीचा पाढा वाचलाय. आणि बागडेंच्या एसीबी चौकशीची मागणीही केलीय. दरम्यान, अजित पवारांनी एकनाथ शिंदे यांच्यावरच अप्रत्यक्ष टीका केल्याची चर्चा आता रंगलीय.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram