Ajit Pawar Security : गुप्तवार्ता विभागाच्या सूचनेनंतर अजित पवारांच्या सुरक्षेत वाढ
Ajit Pawar Security : गुप्तवार्ता विभागाच्या सूचनेनंतर अजित पवारांच्या सुरक्षेत वाढ
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आी आहे. आज अजित पवार मालेगाव, धुळे आणि जळगाव दौऱ्यावर आहेत. अजित पवार यांची विशेष काळजी घेण्याच्या गुप्त वार्ता विभागाच्या सूचनेनंतर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. गुप्तवार्ता विभागाच्या सूचनेनंतर पोलिसांनी अजित पवार यांची सुरक्षा वाढवली आहे.
मालेगावमध्ये माजी आमदार आसिफ शेख यांची अजित पवारघेणार भेट
अजित पवार बोलता मालेगावच्या दिशेनं निघाले आहेत. मालेगावमध्ये अजित पवार हे आज माजी आमदार आसिफ शेख यांची भेट घेणार आहेत. आसिफ शेख मालेगाव मध्यमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्याची चाचपणी अजित पवार करणार आहेत. अल्पसंख्याक समाज लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (महायुती) पासून दूर गेल्यानं त्यांना जवळ करण्याचा प्रयत्न आजच्या दौऱ्यात राहणार आहे. आसिफ शेख यांच्या भेटीनंतर अजित पवार धुळे आणि अमळनेरच्या दौऱ्यावर आहेत. माजी आमदार रशीद शेख यांच्या निधनानंतर अजित पवार हे आज त्यांची सांत्वनपर भेट घेणार आहेत. आसिफ शेख यांनी राष्ट्रवादीला ( शरद पवार गट ) सोडचिठ्ठी दिल्याने त्यांच्या भेटीला महत्व आलं आहे. आसिफ शेख हे मालेगाव मध्य मधून उमेदवारी करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
माजी आमदार आसिफ शेख यांच्या घरी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या ताफ्यातील वाहनांचे चेकिंग करुन पोलिसांनी खात्री देखील केली आहे.