Ajit Pawar NCP : डॅमेज कंट्रोलसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक,टेंभुर्णीत महत्त्वाची बैठक
Continues below advertisement
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाने डॅमेज कंट्रोलसाठी हालचाली सुरु केल्या आहेत, मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली टेंभुर्णीत एक महत्त्वाची बैठक पार पडली. भाजपच्या 'मिशन लोटस'च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सतर्क झाल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथे ही बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला करमाळ्याचे माजी आमदार संजय शिंदे आणि उमेश पाटील यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. अजित पवार गटाने सोलापूर जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि संभाव्य राजकीय नुकसान टाळण्यासाठी ही रणनीती आखल्याचे बोलले जात आहे. या बैठकीनंतर मंत्री दत्तात्रय भरणे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement