Ajit Pawar : मी काय उखाणा घ्यायला आलो का? अजितदादांची तुफान फटकेबाजी
Continues below advertisement
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामतीच्या दौऱ्यावर असताना आपल्या भाषणातून जोरदार फटकेबाजी केली आहे. विकासकामांच्या पाहणीवेळी त्यांनी राजकारणातील कंत्राटदारी आणि निधीच्या वापरावरुन स्पष्ट शब्दात इशारा दिला. 'तू पण मी पण पुनश्च वर घेऊन जाणार नाही आणि पोरबाळांना किती देवू नको त्यांना कमीच वाटतंय, काहीच ठेवू नको,' अशा शब्दात अजित पवारांनी एक सूचक विधान केले आहे. ज्यांना फक्त कॉन्ट्रॅक्टसाठी राजकारणात यायचे आहे, त्यांनी राजकारणात येऊ नये, असा थेट इशाराच त्यांनी दिला. विकासकामांसाठी दिलेल्या निधीचा पैसा न पैसा हिशोब लागतो आणि कामाचा दर्जा राखला गेलाच पाहिजे, असेही त्यांनी ठणकावले. त्यांच्या या दौऱ्यामुळे आणि वक्तव्यांमुळे बारामतीच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement