Nilesh Ghaywal : घायवळचा जामीन रद्द होणार? पोलिसांची हायकोर्टात धाव
Continues below advertisement
पुणे पोलिसांकडून (Pune Police) गँगस्टर निलेश घायवळच्या (Nilesh Ghaywal) जामीन रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) याचिका दाखल करण्यात आली आहे, तर दुसरीकडे नांदेडमध्ये (Nanded) दुषित पाण्यामुळे विषबाधा झाल्याची मोठी घटना घडली आहे. 'घायघोळनं अटीशर्तीचं पालन न केल्यामुळे जामीन रद्द करावा', अशी मागणी पोलिसांनी याचिकेत केली आहे. घायवळने पोलीस ठाण्यात हजेरी चुकवली आणि पासपोर्ट जमा केला नाही, त्यामुळे त्याचा जामीन रद्द करावा, असे पोलिसांनी म्हटले आहे. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील चेनापूर तांडा येथे विहिरीचे पाणी प्यायल्याने सुमारे ७० ते ७५ लोकांना विषबाधा झाली. या सर्वांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement