Ajit Pawar funny dialogues : बुरा ना मानो दिवाली है, फनी दादांची फटकेबाजी, अजित पवार यांची कॉमेडी
Continues below advertisement
बारामतीतील भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजकीय निष्ठा आणि स्थानिक कारखानदारीवरून विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. 'दिवसा ज्यांच्याबरोबर असाल, रात्री पण त्यांच्याच बरोबर राहा, नाहीतर रात्री दुसऱ्याला भेटून चर्चा करता', असा थेट इशारा त्यांनी दिला. दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांनी कष्टानं उभा केलेला कारखाना परराज्यातील माणसे चालवत आहेत, आपल्यात धमक नाही का? असा सवाल करत त्यांनी स्थानिक नेतृत्वावर टीका केली. भाषणात त्यांनी बदलत्या काळाचा उल्लेख करत, आजची तरुण पिढी पारंपरिक खेळ विसरून 'PUBG' सारख्या खेळात अडकल्याची खंत व्यक्त केली. एका भगिनीचा मुलगा 'PUBG' मध्ये दीड-दोन लाख रुपये हरल्याचा हृदयद्रावक अनुभवही त्यांनी सांगितला. चांगल्या लोकांना निवडून द्या, मी गाव दत्तक घेऊन काय करू, असे आवाहनही त्यांनी ग्रामस्थांना केले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement