Nagpur Rada : नागपूर पालिकेत काँग्रेस आक्रमक, आयुक्तांच्या दालनाबाहेर राडा

Continues below advertisement
नागपूरमध्ये (Nagpur) कचरा आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून काँग्रेस (Congress) आक्रमक झाली असून, आमदार विकास ठाकरे (Vikas Thakre) यांच्या नेतृत्वात महापालिका कार्यालयात आंदोलन करण्यात आले. 'आज जर आयुक्तांनी निर्णय घेतला नाही तर उद्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्यांच्या घरात शहरातला कचरा नेऊन टाकू', असा थेट इशारा आमदार विकास ठाकरे यांनी पालिका आयुक्त अभिजीत चौधरी (Abhijeet Chaudhari) यांना दिला आहे. आंदोलकांनी पोलिसांचे बॅरिकेडिंग तोडून आयुक्तांच्या कार्यालयापर्यंत धडक दिली, जिथे पोलिसांशी झटापट झाली. शहरात कचऱ्याचे ढीग साचले आहेत, ड्रेनेज व्यवस्था कोलमडली आहे आणि प्रशासक राजमध्ये अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. फायर एनओसी (Fire NOC) आणि नकाशा मंजुरीसाठी (Map Sanction) दलाल पैसे मागत असून, त्यांच्या ऑडिओ क्लिप्स आपल्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला. दोन वर्षांपासून नागपूर महानगरपालिकेवर प्रशासक राजवट असल्याने नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola