Chakan Traffic | अजित पवार अॅक्शन मोडवर, चाकण कोंडीवर तोडगा काढण्यासाठी पहाटेच पाहणी

पुण्यातील चाकण भागातल्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पहाटे सहा वाजताच चाकण चौकात येऊन पाहणी केली. पुणे-नाशिक आणि चाकण-शिक्रापूर मार्गावरील या चौकात नेहमीच वाहतूक कोंडी होते. चाकण एमआयडीसीमध्ये पंधराशे छोट्या-मोठ्या कंपन्या असून, त्यात साडेतीन लाख कर्मचारी काम करतात. यामुळे या परिसरात रोज लाखभर वाहनं ये-जा करतात. चाकण-शिक्रापूर मार्गावरून अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरहून येणारी अवजड वाहतूक जेएनपीटीकडेही जाते. त्यामुळे या चौकातील कोंडी फोडणं हे सरकारसमोर मोठं आव्हान आहे. या पाहणीदरम्यान, "आता मी एक निर्णय करून स्वतः गाडीत असताना बघत आहे तो," असे अजित पवारांनी वाहतूक कोंडीबद्दल म्हटले. वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola