Maharashtra Politics : बाबासाहेब पाटलांनी पालकमंत्रीपद सोडलं, अजित पवारांचा मोठा खुलासा
Continues below advertisement
राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil) यांनी गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा (Gondia Guardian Minister) राजीनामा दिला असून, त्यांच्या जागी आता इंद्रनील नाईक (Indranil Naik) यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. 'ते नको म्हणतायत तर इंद्रनील नाईकला राज्यमंत्री आहे आमचा, त्यांना ती जबाबदारी द्या, अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांना केली आहे', असं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. बाबासाहेब पाटील हे लातूरमधील अहमदपूरचे असल्याने गोंदिया जिल्हा त्यांना लांब पडत होता. तसेच, प्रकृती अस्वास्थ्यामुळे आणि नुकत्याच झालेल्या गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर लांबचा प्रवास टाळण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पालकमंत्री जिल्ह्यात फिरकत नसल्याची टीका केली होती, त्या पार्श्वभूमीवर हा बदल झाल्याची चर्चा आहे. मात्र, अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement