Ajit Pawar : निवडणूक कमळावर लढवण्याचा प्रश्नच नाही, अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका
Continues below advertisement
Ajit Pawar : निवडणूक कमळावर लढवण्याचा प्रश्नच नाही, अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका
अजित पवार यांनी त्यांच्या गटाच्या बैठकीत मोठी वक्तव्य केली आहेत. काही जण जाणीवपुर्वक सांगत आहेत की हे कमळावर लढणार आहेत असं काही नाही, आपण भाजपच्या चिन्हावर लढणार नाही असं अजित पवार म्हणाले. कोण कोणाला ओवळाताना फोटो येतात आणि मग दबक्या आवाजात चर्चा होतात मात्र तसं काहीही नाहीये. आपण आता माघार घेणार नाही, शरद पवार गटात परत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशा आशयाचं वक्तव्य अजितदादांनी केलं. आपल्याला गद्दारी आणि मॅचफिक्सिंग करायचं नाही, जर त्यांचा उमेदवार असेल तर त्यांना मदत करायची, आणि त्याच्या बदल्यात आपल्याला ते मदत करतील, असं देखील अजित पवार म्हणाले.
Continues below advertisement