Ajit Pawar Pune : माझ्या बापाच्या आणि चुलत्याच्या पुण्याईने एकदम चांगलं चाललंय - अजित पवार

Ajit Pawar Pune : माझ्या बापाच्या आणि चुलत्याच्या पुण्याईने एकदम चांगलं चाललंय - अजित पवार
ळेचे पालन सगळ्यांनी केलं पाहिजे अशी माझी भावना आहे  जन्माला आल्यानंतर मुलं पहिल्यांदा शिकते ते आई मा किंवा अलीकडे मम्मी आहे  परदेशात गेलेली मुलं दुर्दैवाने विसरून जातात... काही मुलं तर आई वडील गेल्यानंतर VC द्वारे कार्यक्रम करतात हे दुर्दैव आहे... परदेशात मुलगा आणि सून वडिलांना विमानतळावर कसे सोडून गेले याबाबत पोलीस अधिकाऱ्याने सांगितलेला किस्सा अजित पवारांनी सांगितला... हा सोहळा अविस्मरणीय आहे  मी वेळेला महत्व देणारा आहे  वेळेच पालन हे सर्वांनी केलं पाहिजे  मातृ नाम प्रथम ही आपली सर्वांची संस्कृती आहे  जन्माला येणारा प्रत्येक जण पहिल्यांदा आई, मा किंवा आता मम्मी म्हणतो ही आपली संस्कृती आहे  संकर्षण कराडे माझ्या सासरवाडीचा आहे माझी सासरवाडी मराठवाडा आणि हा बाबा तिथलाच आहे आपल्या महाराष्ट्राला मातृशक्तीची गौरवशाली परंपरा आहे  मी अलिकडच्या काळात पाहत आहे की मुलांवर लहानपणापासून संस्कार झालेच पाहिजे पण अनेकांची मुलं, सून मुली, जावई या परदेशात आहेत.. दुर्दैवाने हे लोक आपल्या आई-वडिलांना विसरून जातात परदेशात गेल्यानंतर  आई किंवा वडील आपल्यातून निघून गेले तर ते व्हिडीओ कॉलवरून अंत्यविधीचा कार्यक्रम करतात हे दुर्दैव आहे  नाईलाजाने आता आम्हाला वृद्धाश्रम काढावे लागत आहेत हे खरच दुर्दैवी आहे  अशा गोष्टी अलिकडे घडत आहेत म्हणून अशा कार्यक्रमांना महत्व आहे  आपल्या सर्वांना आईना घडवला आहे म्हणून आपल्या नावासमोर आईच नाव घेण्याचा कायदा आमच्या सरकारने आणला  महिलाना राजकारणात ३३ टक्के आरक्षण आपण दिलं आहे  जर स्त्री चूल आणि मूल घर संभाळू शकते ती स्त्री गाव , नगरपरिषद देखील संभाळू शकते असा विश्वास आम्हाला आहे म्हणून राजकारणात हे आरक्षण आणलं शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस आरक्षणाचे बिल आणलं, पवार साहेबांनी सांगितलं होतं की हे बिल मंजूर झाल्याशिवाय सभागृहाचे कामकाज सुरू राहील मला आठवत आहे की सभागृह चार वाजेपर्यंत  चालवलं आणि महिला आरक्षणाचे बिल पास करून घेतल साहेबांनी ठणकावून सांगितलं की आज कितीही उशीर झाला तरी चालेल पण आज महाराष्ट्रात महिला आरक्षणाचे बिल मला आणायचा आहे आणि हे बिल साहेब मुख्यमंत्री असताना पास झाल अजित पवारांनी सांगितला महिला आरक्षण बिल पास करतानाचा शरद पवार साहेबांचा "तो" किस्सा आज मुली सगळीकडे पुढ आहेत मुली फक्त अभ्यासातच लक्ष देतात त्या मुलांसारखं इकडे तिकडे लक्ष देत नाहीत  त्याच्यामुळे ज्या देशात महिलांना सन्मान दिला जातो ती देश पुढे आहेत जिथ महिलांना सन्मानला जात नाही तो देश मागासलेला असतो  मुलींना पूर्वी शिकण्याचा अधिकार नव्हता त्यावेळी याच पुण्यात महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली मुलींची शिक्षणाची सोय केली आणि तिथून सुरू झालेला प्रवास इथपर्यंत पोहोचला आहे  आता भिडे वाडा सरकारने ताब्यात घेतला आहे. तिथ पहिली मुलींची शाळा सुरू झाली होती तिथं काम आता सुरू केलं आहे  पहेलगाम मध्ये अतिरेक्यांनी अनेकांना मारलं , पण याचा बदला घेतला पाहिजे आणि मास्टरमाईंड शोधून त्यांना संपवलं पाहिजे अशी भावना आपली होती, आणि त्यावेळी भारत पाकिस्तान मध्ये युद्ध झालं आपण सगळेजण देशाचे मनोधैर्य वाढवण्याचे काम करत होतो  त्याही वेळी दोन महिलांनी मिडिया समोर येऊन माहिती दिली विंग कमांडर  अस त्यांचं नाव  काही लोकांनी त्यांच्यावर टीका केली हे चुकीच आहे आम्हाला याचं वाईट वाटतं  संकर्षण म्हणाला की दादा मी एक नवीन नाटक काढल आहे त्याचा पन्नासावा प्रयोग बघायला या मी त्याला म्हटलं की आता रोज आम्ही नाटक करत असतो मला काय नाटक दाखवणार आम्हालाही वाटतं नाटकाला जावं पण कामातून वेळ भेटत नाही आमचे सहकारी नेहमी काहीतरी घेऊन येतात हे करा ते करा अरे सारखं काय करा तुझं कर्तुत्व असेल तर मी करेन सारखं पुढ करतात काम मात्र करत नाहीत जाऊदे आता जास्त नाही बोलणार निवडणूक आहेत

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola