Ajit Pawar : अजित पवारांची पत्रकार परिषद; मोठी घोषणा होण्याची शक्यता

Continues below advertisement

Ajit Pawar : अजित पवारांची पत्रकार परिषद; मोठी घोषणा होण्याची शक्यता  

महायुती सरकारने सध्या लावलेल्या योजनांच्या धडाक्यामुळे राज्याचा आर्थिक गाडा रुळावरुन घसरेल, याची जाणीव अर्थमंत्री अजित पवार यांना आहे. त्यामुळेच ते अर्थखात्याच्या कारभाराला शिस्त लावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच आता महायुतीच्या नेत्यांकडून अजित पवार (Ajit Pawar) यांना साईडलाईन करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी केले. ते शुक्रवारी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

अजित पवार हे गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक 10 मिनिटांत सोडून बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे. याविषयी विजय वडेट्टीवार यांना विचारणा केली असता त्यांनी म्हटले की, महायुतीत वाद नेहमीचे आहे. प्रत्येक कॅबिनेटमध्ये वाद होतात. हे राज्याच्या हितासाठीचे वाद नाही, तर स्वतःच्या हितासाठीचे हे वाद आहेत. तिजोरीत पैसा नसताना सरकारने 80 निर्णय घेतले,  यांना कोणाची चिंता आहे? अनेक विभागांमध्ये सचिव नाहीत. कृषी विभागात सचिव नाही, मर्जीतले सचिव बसून राज्याची तिजोरी लुटत आहेत, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.

महायुतीच्या नेत्यांनी अजित पवार यांनाही बाजूला सारण्याचे प्रयत्न सुरु केले असावेत.  अजित पवार अनेक वेळेला विविध खात्याचे मंत्री राहिले आहेत. त्यांनी अर्थ विभागात शिस्त निर्माण करण्याचे प्रयत्न केले. मात्र, सध्या शिस्त बिघडून सर्व काम सुरु आहे. पैसे नसताना जीआर काढले गेले. हे निर्णय टक्केवारी मोजण्यासाठी घेतले जात आहेत. अजितदादांनी कुठे जावं हा त्यांचा प्रश्न आहे. ज्या पद्धतीने त्यांची माणसे निघून जात आहे, त्यामुळे ते अस्वस्थ आहेत, महायुतीत तर भाजप नेते अजितदादा यांना साईडलाईन करण्या प्रयत्न करत आहेत, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram