Ajit Pawar on Pune Bank : घोटाळ्याची धास्ती, म्हणून अजितदादांचा पुणे जिल्हा बँकेवरुन राजीनामा
Continues below advertisement
Ajit Pawar on Pune Bank : घोटाळ्याची धास्ती, म्हणून अजितदादांचा पुणे जिल्हा बँकेवरुन राजीनामा
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बँक घोटाळ्याची चांगलीच धास्ती घेतलीये, यातूनच पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. अशी जाहीर कबुली अजित पवारांनी दिली. पिंपरी चिंचवडमधील पीडिसीसी बँकेच्या वाकड शाखेच्या स्थलांतर समारंभात अजित पवार बोलत होते. यावेळी सांगलीतील एका बँकेचे शरद पवारांच्या उपस्थितीत उद्घाटन केले अन गाडीत बसताच बँकेला लवकरचं टाळे लागणार. असं मी पवार साहेबांना म्हणालो अन आज या बँकेला टाळे लागल्याचा तसेच काही बँकांची अख्खी बॉडी तुरुंगात असल्याचा दावा अजित पवारांनी केला. कायदे इतके कठोर झालेत, हे पाहून मी पण पीडिसीसी बँकेचा राजीनामा देऊन टाकला. अशी कबुली अजित दादांनी देताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
Continues below advertisement