Kolhapur Flood : कोल्हापुरातल्या पुरासाठी अलमट्टी धरण जबाबदार नाही : अजित पवार Ajit Pawar

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज कोल्हापुरातल्या पूरस्थितीचा आढावा घेतला... शिरोळ, शाहुपुरी आणि चिखली परिसरात पुरामुळं झालेल्या नुकसानाचा अजित पवारांनी आढावा घेतला. या परिसरातल्या स्थानिकांनी उपमुख्यमंत्र्यांकडे वेगवेगळ्या मागण्या सादर केल्यात. तूर्तास कोल्हापुरात अत्यावश्यक सेवा सोडून इतरांना इंधनविक्री केली जाणार नसल्याचं अजितदादांनी स्पष्ट केलंय.  दरम्यान पुरामध्ये पाण्याखाली जाणाऱ्या पुणे-बंगळुरु महामार्गावर फ्लायओव्हर बांधण्याची मागणी नितीन गडकरींकडे करणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं.. अतिक्रमणासाठी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देखील उपमुख्यमंत्र्यांनी दिलाय. दरम्यान कोल्हापुरातल्या पुरासाठी अलमट्टी धरण जबाबदार नसल्याचं म्हणत त्यांनी समितीच्या अहवालावर बोट ठेवलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola