Ajit Pawar on Padva : पक्ष,कुटुंबानंतर पाडव्यातही फूट! अजितदादांचा पाडवा काटेवाडीत
Ajit Pawar on Padva : पक्ष,कुटुंबानंतर पाडव्यातही फूट! अजितदादांचा पाडवा काटेवाडीत
दिवाळी म्हटलं की, बारामतीत पवार कुटुंबीय एकत्रित येण्याचा क्षण असतो. मात्र आधी लोकसभा आणि आता विधानसभेत पवार कुटुंबियांत राजकीय कटुता निर्माण झाली आहे. त्यामुळं आता या दिवाळीत पवार कुटुंबीय एकत्रित येतील का? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांना याबाबत विचारलं असता आपल्याला दिसेलचं, असं म्हणत त्यांनी स्पष्टपणे बोलणं टाळल्याचं दिसून आलं.
आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः नाना काटे यांची मनधरणी करण्यासाठी त्यांच्या घरी पोहचले चर्चेनंतर जेव्हा ते जाण्यासाठी निघाले तेव्हा, माध्यमांशी अजित पवारांनी संवाद साधला त्यावेळी, सुप्रिया सुळे असं म्हणताच भाऊबीजबद्दल पत्रकार विचारतील हे हेरून दादांनी काढता पाय घेतला. पुरंदरमध्ये अजित पवारांनी उमेदवार दिल्यानं विजय शिवतारेंनी टीका केली. मला महायुतीत एकोपा ठेवायचा आहे, असं म्हणत त्यांच्यावर इतर नेते उत्तर देतील असं अजित पवार म्हणालेत. चिंचवडमधील तिढा सोडविण्याच्या दृष्टीने अजित पवारांनी नाना काटे यांची भेट घेतली. मात्र काटे माघार घेणार का? यावर ही चार तारखेला चित्र स्पष्ट होईल असं दादा म्हणाले.
दुसरीकडे मावळ विधानसभेत सुनील शेळकेंचा प्रचार करायला देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे इतर नेते येतील असा दावा ही अजित पवारांनी केला आहे. मावळ पॅटर्न अडचणीचा ठरेल का? असं विचारलं असता, थोड्या दिवसांत तोडगा निघेल असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.