Pawar Politics: शरद पवारांसोबत युतीवर Ajit Pawar यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले 'चाचपणी करून निर्णय घेऊ'
Continues below advertisement
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटासोबत संभाव्य युतीबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत. राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना, कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या भूमिका समोर येत असल्याचे त्यांनी नमूद केले. 'तुम्ही चाचपणी करा, चाचपणी करून समोर कसं, काय घडतंय त्या पद्धतीनं आपण आपले निर्णय घेऊ,' असे सांगत त्यांनी सध्या परिस्थितीचा आढावा घेण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिल्याचे स्पष्ट केले. सध्या सर्व राजकीय पक्ष निवडणूक कामात व्यस्त असून, अर्ज भरण्याची प्रक्रिया १७ नोव्हेंबरपर्यंत चालणार असल्याने, योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असेही ते म्हणाले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement