Ajit Pawar NCP List : राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता

Continues below advertisement

Ajit Pawar NCP List :  राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता 

 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत बाजी मारली आहे. महायुतीतील (Mahayuti)  मोठा पक्ष आलेल्या भाजपने बाजी मारताना (BJP First Candidate List for Maharashtra Assembly Election 2024) पहिल्या यादीत 99 उमेदवार जाहीर केले आहेत. पहिल्या यादीमध्ये भाजपकडून विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर 13 महिला सुद्धा उमेदवारीच्या रिंगणामध्ये आहेत.  असे असताना राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar)  गटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज आपल्या राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी (Ajit Pawar NCP First Candidate List for Maharashtra Assembly Election 2024) आज संध्याकाळ पर्यंत जाहीर  करणार असल्याची शक्यता आहे. हाती आलेल्या माहितीनुसार पहिल्या यादीत 32- 35 नाव असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर यादी जाहीर करण्यापूर्वीच अजित पवार उमेदवारी निश्चित असलेल्या आमदारांना एबी फॅार्मचे वाटप करत असल्याची माहितीही पुढे आली आहे.  शिंदे यांच्या उमेदवारांची यादी सुद्धा आजच येण्याची शक्यता दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदे यांच्या उमेदवारांची यादी सुद्धा आजच येण्याची शक्यता आहे. पहिल्या यादीमध्ये 50 उमेदवार असतील असे बोलले जात आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडून बंडाळी केल्यानंतर त्यावेळी साथ दिलेल्या सर्वच आमदारांना पहिल्या यादीमध्ये स्थान दिलं जाईल असं बोललं जात आहे. अजित पवार यांच्याकडूनही यादी लवकरात लवकर जाहीर केली जाईल असं बोललं जात आहे. दरम्यान, भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये मराठवाडामध्ये 16 विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार देण्यात आले आहेत. मात्र यामध्ये आता भोकर या मतदारसंघाची वाढ झाल्याने एकूण 17 ठिकाणी भाजप उमेदवार असतील. यामध्ये बीड जिल्ह्यातील गेवराई येथून उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. मागीलवेळी येथून लक्ष्मण पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. छत्रपती संभाजी नगरमधून फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपाल पदी नियुक्ती झाल्याने त्या ठिकाणी भाजपकडून अनुराधा चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram