Ajit Pawar Meet Amit Shah : अजितदादांनी घेतली अमित शाहांची भेट ; विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा

Continues below advertisement

Ajit Pawar Meet Amit Shah : अजितदादांनी घेतली अमित शाहांची भेट ; विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा

ही बातमी पण वाचा

मुंबई : लोकसभा निवडणुकीतील मोठ्या पराभवानंतर विधानपरिषद (Vidhanparishad) निवडणुकीत महायुतीच्या सर्वच्या सर्व 9 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे, महायुतीच्या नेत्यांमध्ये आनंद आणि उत्साह दिसून येत असून या विजयाचे शिल्पकार म्हणून उपमुख्यमंत्री व भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं जातंय. मात्र, 11 जागांसाठी उभा राहिलेल्या 12 पैकी एका उमेदवाराचा पराभव झाला आहे. तब्बल 5 वेळा विधिमंडळ सभागृहात सदस्य राहिलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांना राजकारण्यांनी धूळ चारली. या निवडणुकीत जयंत पाटील (Jayant patil) यांना पराभवाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाने जयंत पाटील यांना पुरस्कृत केले होते. तरीही, त्यांचा पराभव झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर, महायुती व महाविकास आघाडीचे नेते एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. आता, शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत (Uday samant) यांनीही जयंत पाटील यांच्या पराभवावरुन महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटावर हल्लाबोले केला आहे. 

विधानपरिषद निवडणुकीत जयंत पाटील यांचा पराभव झाल्यानंतर माजी आमदार कपिल पाटील यांनीही ट्विट करुन नाराजी व्यक्त केली होती. इंडिया आघाडीत आपण सोबत राहिलो. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी त्यांना मतदान केलं. इंडिया आघाडीतल्या प्रमुख पक्षांची तक्रार होती की, भाजपने त्यांचे पक्ष चोरले, पळवले. पण इंडिया आघाडीतील छोट्या पक्षांशी मोठे पक्ष कसे वागले? भाजपसारखेच? तूर्त रजा घेतो, पण कायम तुमच्या सोबत आहे, अशी खंत कपिल पाटील यांनी ट्विटमधून बोलून दाखवली होती. तर, भाजप नेते आशिष शेलार यांनीही ट्विट करुन महाविकास आघाडीतील उबाठा पक्षाच्या अजगराने शिक्षक भारती, शेकाप आणि कम्युनिष्ट या तिन्ही पक्षाला गिळल्याचं म्हटलं आहे. आता, मंत्री उदय सामंत यांनीही यावर प्रतिक्रिया देताना ठाकरेंना लक्ष्य केलं.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram