Ajit Pawar ED Inquiry? : अजित पवार ईडीच्या रडारवर? राज्य सहकारी बॅंके प्रकरणाच चौकशीची शक्यता

Continues below advertisement

अजित पवारांची ईडी चौकशी होण्याची दाट शक्यता आहे... प्रकरण आहे राज्य सहकारी बँकेतील कथित 25 हजार कोटींच्या घोटाळ्याचं. खरं तर या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारच्या काळात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला होता. मात्र अजित पवार आणि शरद पवार यांच्या भूमिकेची चौकशी न होताच क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला, असा ठपका ठेवत पुन्हा याचिका दाखल करण्यात आल्या. या प्रकरणात ईडी चौकशी करणार असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेनं न्यायालयाला याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान दिली. अजित पवारांसह बँकेच्या तत्कालीन 76 संचालकांची पुन्हा चौकशी होणार असल्याचं कळतंय. राज्य सहकारी बँकेत 25 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram