Ajit Pawar Majha Vision: धनंजय मुंडेंचा राजीनामा ते नितेश राणेंवर रोखठोक भाष्य, अजित पवारांचं व्हिजन

Ajit Pawar Majha Vision: धनंजय मुंडेंचा राजीनामा ते नितेश राणेंवर रोखठोक भाष्य, अजित पवारांचं व्हिजन

(शंभर दिवस कसे होते) लोकसभा निकालानंतर आम्ही सर्वच नर्व्हस झालेलो होतो. 31 आणि 17. दिल्लीत सरकार होतं. आम्ही विचार करत होतो, कोणत्या योजना द्यायच्या, काय करायचं. महाराष्ट्रातील जनता लोकसभेला वेगळं मतदान करतात, विधानसभेला वेगळं. एकदा एकाच दिवसी मतदान झालं. पण दिल्लीत वाजपेयी सरकार व राज्यात विलासराव सरकार आलं. त्यामुळेचं असं वाटत होतं की आपण काही चांगंल काही घेऊन गेलो. असं लक्षात आलं होतं की महाराष्ट्रात काही मान्यवरांच्या विरोधात बोललेलं लोकांना आवडतं नाही. जसं की पवारसाहेबांच्याविरोधात बोललेलं आवडत नाही. त्यांच्याबद्दल 'भटकती आत्मा' असं बोललं गेलं. त्यावर त्यांनी सांगितलं की शेतकऱ्याचंयया कांद्याला भाव द्यायला भटकतो, दूधाचे दर द्यायला भटकतोय. मग आम्ही ठरवलं की आपली भूमिका पॉझिटीव्ह मांडायची. आम्हाला संधी द्या. लाडक्या बंहिणींचंी काम करु. जनतेला पटू शकणारे विचार मांडायला सुरुवात केली.  जागावाटपात थोडी चढाओढ झाली. पण त्यातून मार्ग काढला.खरोखरच कुणालाच वाटलं नव्हतं की इतक्या जागा कुणाला येतील. विरोधकांनाही वाटलं नव्हतं की दोनअंकी राहू. महाराष्ट्राच्या इतिहासात इतका एकतर्फी निकाल लागला नव्हता. त्यानंतर आता अर्थसंकल्पम मांडताना आर्थिक शिस्त लावायला लागेल. केंद्राचे नियम की किती टक्के लोन काढलं पाहीजे, ते मापदंड दिलेलं आहे, त्याच्याबाहेर जायचं नाही. तर मी त्यांना सांगितलं की सहकार्य करा. त्यावर ते हो म्हणाले. यावेळी काही कठोर भूमिका घ्यावी लागेल. आता जी काम चाललीयेत त्याची बिलं द्यायला प्राधान्य द्यावं लागेल. त्यावर त्यांनी होकार दिला.  आता जे झालयं ते झालयं, आता त्यातून मार्ग काढावा लागेल.  हे वर्ष व्यवस्थित काढलं तर पुढच्या वर्षी रुळावर यायला वेळ लागणार नाही. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola