Ajit Pawar : बारामतीमधून अजित पवारांनी भरलेला निवडणूक अर्ज बाद
Ajit Pawar : बारामतीमधून अजित पवारांनी भरलेला निवडणूक अर्ज बाद बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारांकडून भरण्यात आलेला निवडणूक अर्ज ए बी फॉर्म न जोडल्याने बाद ठरवण्यात आला आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी 51 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले असून त्यातील पाच निवडणूक अर्ज छाणणीत बाद ठरवण्यात आले.
अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढववत असून अजित पवारांनी डमी उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता.