Ajit Pawar Full PC : अल्पवयीन आरोपीचं वय 18 वरुन 14 वर करण्याचा विचार, अजित पवार यांची माहिती
Ajit Pawar Full PC : अल्पवयीन आरोपीचं वय 18 वरुन 14 वर करण्याचा विचार, अजित पवार यांची माहिती
राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांचे बिल माफ केले आहे हे सांगितले होते. आम्ही वचनपूर्ती करणारे आहोत.. 25 जुलै ला आम्ही वीजबिल माफीचा निर्णय घेतला होता. 14 हजार कोटी राज्य सरकारने भरले. पुन्हा जर महायुतीचे सरकार असेल तर अशीच झिरोची बिले दिली जातील.. एका शेतकऱ्यांला झिरो बिल दिले जात आहे. 81 हजार रुपयांचे बिल शेतकऱ्यांचे बिल माफ केले. प्रायोगिक तत्त्वावर 3 जणांना बिल दिले. आज आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना नोंदणी उपक्रम आपण सुरू केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 140 कोटी जनते करता ही योजना आणली आहे. * जवळपास पन्नास कोटी लोक या योजना लाभ घेण्यास पात्र असतील * १३५० लहान मोठ्या आजारांवर या योजनतेतून उपचार केले जातील. * पाच लाखापर्यंत मोफत उपचार या योजनेतून लाभार्थ्याला मिळणार आहेत. * वयोमर्यादा नाही. आजपासून नवरात्रोत्सव सुरु होत आहे. आज सकाळी सहा वाजता एक तास पोलीस अधिकाऱ्यांशी बैठक घेत मी चर्चा केली आहे. 1991 पासून मला बारामतीचे प्रतिनिधीत्व करण्याची तुम्ही संधी दिली. बघता बघता 34 वर्षे झाली आज 34 वर्षानंतर तुमच्या समोर आहे. शहरी किंवा ग्रामीण भागात कायदा सुव्यवस्था चांगली असावी. मला माहिती मिळते इथे ड्रग चे प्रकार चालू आहेत.पुण्यातून ते ड्रग्स मागवले जातात.कसली तरी इंजेक्शन असतात ती मागवली जातात काही काही जण मोकातून सुटून आलेत. ते चौकात उभे राहतात जणू काय आहे. त्यांनी चौक वाटून घेतलेत.तिथे शायनिंग करण्याचा प्रयत्न करतात. परवा 17 वर्षाची तीन मुलं. वयाने सारखे होते काय दोघांच्या मनात आले त्यांनी सपासप वार केले. आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्य आहे वैयक्तीक स्वातंत्र आहे पण शेवटी काय करावं हा तुमचा अधिकार आहे. बाजारात भाजीपाला विक्रीला माय माऊली बसतात, कुणीतरी मिरच्या उचलायचा पूर्वी अशी प्रकार घडत होते असं मी ऐकलं आहे.