Maharashtra Politics: 'पुढच्या आठवड्यात आचारसंहिता, निधी मिळणार नाही', Ajit Pawar यांचा इशारा
Continues below advertisement
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत (Local Body Elections) मोठे विधान केले आहे. 'पुढच्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे आणि निवडणुका होईपर्यंत जिल्हा परिषद, तालुका परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायत या सगळ्यांना आता कुठलाही निधी मिळणार नाही,' असे स्पष्ट संकेत अजित पवार यांनी दिले आहेत. बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभप्रसंगी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. या घोषणेमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले असून, प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आचारसंहिता लागू झाल्यास विकासकामांसाठीचा निधी थांबणार असल्याने अनेक इच्छुकांची चिंता वाढली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement