NCP Crisis : शरद पवार गटातील सदस्यांना अपात्र करा, अजित पवार गटाची याचिका
शरद पवार गटानंतर अजित पवार गटाची लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापती यांच्याकडे शरद पवार गटातील सदस्यांना अपात्र करा या मागणीसाठी याचिका . याचिका दाखल करताना अजित पवार गटाची नवी खेळी. शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचं नाव याचिकेतून वगळले. शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यावर कारवाई केल्यास या दोन्हीं नेत्यांना सहानभुती मिळू शकते त्यामुळं या दोघांची नावे वगळल्याची सूत्रांची माहिती तर अमोल कोल्हे यांनी शरद पवार गटाला प्रतिज्ञापत्र दिल्यानं त्याचं नाव वगळले . अजित पवार गटाकडून आपल्याकडे लोकसभेत 2 सदस्य असल्याचा दावा . राज्यसभेतील शरद पवार वगळता वंदना चव्हाण आणि फौजिया खान यांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी तर लोकसभेत श्रीनिवास पाटील, मोहम्मद फैजल यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी