ABP News

Ajit Pawar Group Lok Sabha Election : महायुतीतल्या लोकसभेच्या 'या' 9 जागांसाठी अजित पवार गट आग्रही

Continues below advertisement

मुंबई :  लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे.  महायुतीत लोकसभेच्या नऊ जागांसाठी अजित पवार (Ajit Pawar)  गट आग्रही आहे.  राष्ट्रवादीकडील चार  जागांव्यतिरिक्त आणखी पाच जागांची घटक पक्षांकडे मागणी केली आहे.  अजित पवार गटातील संभाव्य उमेदवारांना मतदारसंघात चाचपणीच्या सूचना दिल्या आहेत. आणखी पाच  जागांसाठी महायुतीतील घटक पक्षांकडे  मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या राष्ट्रवादीकडे लोकसभेच्या चार जागा आहेत. बारामती, सातारा, रायगड, शिरूर या चार जागा आहेत. या जागा सोडून  अजित पवार गट धाराशिव, परभणी, दक्षिण मुंबई, भंडारा गोंदिया,  छत्रपती संभाजीनगर या पाच जागांसाठी आग्रही आहे.  रायगडचा पुढचा खासदार भाजपचाच असेल, असे  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले. महायुतीला बाजूला ठेवून रायगडमधून धैर्यशील पाटील लोकसभा निवडणूक लढवण्याचे चंद्रशेखर बावनकुळे  संकेत यांनी दिले. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यानंतर आता  राष्ट्रवादीकडील चार  जागांव्यतिरिक्त आणखी पाच जागांसाठी आग्रही असल्याची माहिती समोर येत आहे 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram