Ajit Pawar Full PC : जेवढं काम करणं शक्य होतं ते करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला

Continues below advertisement

Ajit Pawar Full PC : जेवढं काम करणं शक्य होतं ते करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला 
हेही वाचा : 

अजित पवारांचे उमेदवार सुनील शेळकेंना घेरण्यासाठी मावळमध्ये सांगली पॅटर्न राबवला जाणार आहे. त्यासाठी शरद पवार इथं उमेदवार देणार नसून, बंडखोर बापू भेगडेंना मविआचा पाठिंबा जाहीर करणार आहेत, अशी विश्वासू सूत्रांनी एबापी माझाला माहिती दिली आहे. बापू भेगडेंना मावळ भाजपने आधीचं पाठिंबा जाहीर केला आहे, अशातच आता सुनील शेळकेंच्या पराभवासाठी शरद पवार सुद्धा हा नवा डाव टाकण्याच्या तयारीत आहेत. 

मविआच्या जागावाटपात मावळ शरद पवार गटाच्या वाट्याला येणार आहे. म्हणूनचं बंडखोर बापू भेगडेंनी शरद पवारांकडे पाठिंबा देण्याची मागणी केलेली आहे. पवारांकडून सुद्धा या मागणीला संमती मिळणार असं जवळपास निश्चित मानलं जातं आहे. म्हणूनच शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील काही नेते भेगडेंच्या प्रचारात सक्रिय होताना दिसू लागले आहेत. सोबतच काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना ही भेगडेंना पाठिंबा देत शेळकेंना कोंडीत पकडणार असल्याचं बोललं जातं आहे. त्यामुळं अजित पवार गटाच्या सुनील शेळके विरोधात अवलंबला जाणारा हा मावळ पॅटर्न अतीतटीचा होणार, हे उघड आहे.

मावळच्या जनतेच्या आशिर्वादावर बापू भेगडे यांना निवडूण आणणार असल्याचे बाळा भेगडे म्हणाले. योग्य वेळी योग्य प्रयोग करायचा असतो असे बाळा भेगडे म्हणाले. त्यामुळं मी यावेळी उभा राहणार नाही. आम्ही बापू भेगडे यांना पाठिंबा दिला आहे. मावळ विधानसभा मतदारसंघात भाजप टिकला पाहिजे हीच आमची भूमिका आहे. पाच वर्ष आम्ही खूप भोगलं आहे असे बाळा भेगडे म्हणाले. आज आमचं लक्ष बापू भेगडे यांना निवडून आणणे हेच आमचे लक्ष असल्याचे बाळा भेगडे म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram