Ajit Pawar Full PC : दिल्लीत जरा आराम मिळतो... अजित पवारांनी सगळंच सांगितलं ABP MAJHA

Continues below advertisement

Ajit Pawar Full PC : दिल्लीत जरा आराम मिळतो... अजित पवारांनी सगळंच सांगितलं ABP MAJHA

Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य

मुंबईत आज भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एक मुखाने निवड करण्यात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाला आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचे नाव महायुतीकडून ठरल्यानंतर कार्यकर्त्यांसह नेत्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि आनंद दिसतोय. दरम्यान, उद्या मुंबईतील आझाद मैदानवर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहे. असे असताना त्यापूर्वी महायुतीतील अनेक प्रमुख नेते राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले आहे.या भेटीत महायुतीकडून सत्तास्थापनेचा दावा केला जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे.  

राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा, उद्या शपथविधी सोहळा       

सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी शिवसेनेचे एकनाथ शिंदे, भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे तिन्ही प्रमुख नेते एकाच गाडीतून राज भवनावर पोहचले आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तीन नेते राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेत राज्यात सत्तास्थापनेचा दावा केला आहेत. तर या शपथविधीसाठी इतर पक्षाचे अनेक दिग्गज नेते आणि प्रमुख ही हजेरी लावणार आहे. यासाठी दिल्ली, मणीपूर, नागालॅंड आणि मेघालय राज्याचे प्रमुख आज मुंबईत येणार असल्याची माहिती पुढे आली आहे. महायुतीच्या शपथविधी समारंभात तिन्ही पक्षाचे राष्ट्रीय पातळीवर नेते ही हजेरी लावणार आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram