अजित पवार निधी देत नाहीत, बालसंगोपन निधी अनुदानात वाढीसाठी मंजुरीही देत नाही : यशोमती ठाकूर
बालसंगोपन निधी अनुदानात वाढ करण्याच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री अजित पवार साथ देत नसल्याचा महिला आणि बालविकासमंत्री
यशोमती ठाकूर यांचा गंभीर आरोप. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालूक्यातील पारस फाट्यावरील जाहीर कार्यक्रमात गंभीर आरोप. अन्यायग्रस्त शेतकरी संवाद कार्यक्रमातील भाषणात केला आरोप. आधी बालसंगोपन निधीच्या 450 रूपये अनुदानात वाढ करीत आपण 1125 रूपये केलेत. मात्र, हे अनुदान अपुरं असून यात 2500 रूपये वाढ करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे पाठविला. मात्र, अर्थमंत्री असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार या प्रस्तावाला सहकार्य करीत नसल्याचा आरोप.