Mumbai Vaccination : मुंबईसाठी 1 लाख 60 हजार लशींचा साठा उपलब्ध, आजपासून पुन्हा लसीकरण सुरू
कोविड प्रतिबंधक लसींचा साठा संपुष्टात आल्यामुळे मागील दोन दिवस शासकीय आणि पालिका केंद्रांमध्ये लसीकरण बंद होते. मात्र गुरुवारी रात्री मुंबईला एक लाख 60 हजार 240 लसींचा साठा प्राप्त झाला आहे. या लसींचे वितरण सर्व सरकारी केंद्रांत करण्यात आले आहे. त्यामुळे शनिवारपासून मुंबईतील लसीकरण मोहीम पूर्ववत होणार आहे.