Chakarmany To Konkanvasi | चाकरमनी नव्हे तर कोकणवासी म्हणा, अजित पवारांचे निर्देश

मोठी बातमी समोर आली आहे. कोकणातून मुंबई किंवा अन्य शहरांमध्ये स्थलांतरित झालेल्या नागरिकांना 'चाकरमानी' असे संबोधले जाते. [INDEX] मात्र, आता 'चाकरमानी' नव्हे तर 'कोकणवासीय' असे संबोधण्यात यावे, असे निर्देश अजित पवार यांनी दिले आहेत. [INDEX] या संदर्भात लवकरच शासन परिपत्रक जारी करण्यात येणार आहे. [INDEX] 'चाकरमानी' हा शब्द 'चाकर' म्हणजे सेवक आणि 'मानी' म्हणजे मानणारा यांच्या संयोगातून तयार झाला आहे. कोकणवासीयांच्या काही संघटनांनी या शब्दाला आक्षेप घेतला होता, कारण त्यांना हा शब्द अवमानकारक वाटत होता. त्यामुळे हा शब्द हटवून त्याऐवजी 'कोकणवासीय' असा शब्द वापरण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे कोकणातून स्थलांतरित झालेल्या नागरिकांच्या संबोधनात बदल होणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola