Nagpur Marbat | काळी-पिवळी मारबत एकत्र येणा, अनोखा सोहळा
नागपूरमध्ये मारबत मिरवणुकीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. जागतिक आणि राष्ट्रीय प्रश्नांसोबतच नागपूरकरांच्या स्थानिक समस्यांवरही या मिरवणुकीत 'बडगे' काढले जात आहेत. यंदा महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार असल्याने, महापालिकेच्या कारभारासंदर्भातही प्रश्न मांडले जात आहेत. नेहरू चौकात काळी आणि पिवळी मारबत एकत्र येण्याचा सोहळा लवकरच पार पडणार आहे. परंपरेनुसार, दोन्ही मारबती एकमेकांचे दर्शन घेतात आणि प्रदक्षिणा घालतात. "काळी मारबत अठराशे एक्क्याऐंशीमध्ये तत्कालीन बाकाबाईने इंग्रजांशी हातमिळवणी केली होती, तिचा निषेध करण्यासाठी सुरू करण्यात आली होती," असे सांगितले जाते. त्यामुळे तिचे स्वरूप उग्र दिसते. पिवळी मारबत तेली समाजाने इंग्रजांविरोधात लोकांना सामाजिक प्रश्नांवर एकत्रित आणण्यासाठी सुरू केली होती, त्यामुळे तिचे स्वरूप सौम्य आहे. ही मिरवणूक नागपूरच्या परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे.