Ajit Pawar : Sharad Pawar यांचं 'ते' वक्तव्य खोटं, अजित पवारांचा काकांवर पलटवार कुणीच नवखं नव्हतं

Continues below advertisement

पुणे : शरद पवार (Sharad Pawar)  धादंत खोटं बोलत आहेत असा गंभीर आरोप अजित पवारांनी केलाय. 2004 ला कुणीच नवखं, अननुभवी नव्हतं असं अजित पवारांनी (Ajit Pawar)  म्हटलंय. 2004 मध्ये नेते नवखे असल्यामुळे मुख्यमंत्रीपद नाकारलं असं पवार म्हणाले होते. अजित पवारांनी ते विधान फेटाळून लावलंय. 1991  मध्येच पद्मसिंह पाटील मुख्यमंत्री होणार होते, मात्र सुधाकरराव नाईक पवारांचं ऐकत नव्हते. त्यामुळे मुख्यमंत्री आपलं ऐकणार नाहीत अशी भीती पवारांना होती असं अजित पवार म्हणाले. ते मुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीत बोलत होते.  

अजित पवार म्हणाले,  शरद पवार यांनी 2004 बाबत जे सांगितलं ते धादांत खोट आहे. मला त्यावेळी वाटत होतं की, भुजबळ मुख्यमंत्री होतील. त्यावेळी मी मुख्यमंत्री होण्यासाठी इंटरेस्टड नव्हतो. आपण 2004 साली मुख्यमंत्र्यांची संधी होती. आता आपले वरिष्ठ जे सांगत आहेत की त्यावेळी काहीजण नवे होते. तसं काही नव्हतं. 1991 साली शरद पवार यांना संरक्षण मंत्री व्हाव लागलं त्यावेळी पद्मसिंह पाटील मुख्यमंत्री पदासाठी नाव देण्यात आलं होतं.  माञ मध्येच सुधाकरराव नाईक यांचं नाव देण्यात आलं. त्यावेळी शरद पवार यांचं एक वर्ष सुधाकरराव नाईक यांनी ऐकलं नाही.  2004 साली प्रफुल पटेल आणि शरद पवार यांना वाटलं असेल की आपलं आधीच कोणी ऐकलं नव्हतं त्यामुळं आता पुन्हा मुख्यमंत्री केलं तर आपलं कोण ऐकणार नाही, असं काहीतरी असेल 

साताऱ्याची राज्यसभेची जागा  साताऱ्यालाच मिळेल : अजित पवार 

साताऱ्याची राज्यसभेची जागा  साताऱ्यालाच मिळेल असं अजित पवारांनी म्हटलंय. वाईत प्रचारसभेत अजित पवारांनी आमदार मकरंद पाटलांचे भाऊ नितीन पाटील यांना खासदार नाही केलं तर पवारांची औलाद सांगायचो नाही असं वक्तव्य केलं होतं.  अजित पवर म्हणाले,  प्रत्येकाला मानसन्मान हवा असतो. कार्यकर्ता महत्त्वाचं असतो. लोक देतील तो कौल मान्य करून आपण पुढं जायला हवं. अशी भूमीका सर्वांनी मान्य करायला हावी. आपण वेगळा निर्णय घेतल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती. मागचा वेळी 41 जागा भाजप युतिच्या होत्या तर विरोधक 7 जागेवर होतें. त्यामुळं आपल्याला यांदा जागा कमी मिळाल्या. सातारची जागा जरी आपण दिली असली तरी आता त्या बदल्यात मिळणारी जागा सातारला देण्यात येणार आहे. ही सर्वांनी नोंद घ्यावी. सातारची राज्यसभेची जागा आपण सातारला देणारं आहोत. इतराणी मागणी करू नये. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram