Ajit Pawar Politics: मुलांना खेळायला मैदानं नाहीत, राहुल कुल यांचं नाव न घेता अजितदादांची टोलेबाजी

Continues below advertisement
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दौंड तालुक्यात आमदार राहुल कुल यांच्यावर जोरदार टीका केली आहे, तसेच ऑनलाईन गेमिंगच्या धोक्यांवरही त्यांनी लक्ष वेधले. 'परराज्यातल्या माणसांनी येऊन दौंड तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेला ऊस गाळायचा, आपल्यात कुणाच्यात धमक नाही का?', असा थेट सवाल करत अजित पवारांनी स्थानिक नेतृत्वाला धारेवर धरले. दिवसा एकासोबत आणि रात्री दुसऱ्यासोबत राहण्याची भाषा करत त्यांनी राजकीय निष्ठांवरही बोट ठेवले. बीडमधील एका विधवेचा मुलगा PUBG गेममध्ये विमा संरक्षणाचे दीड ते दोन लाख रुपये हरल्याचा किस्सा सांगत त्यांनी पालकांना मुलांना मोबाईल देताना काळजी घेण्याचा सल्ला दिला. यासोबतच, बारामतीमध्ये विकसित केलेल्या आणि आठ महिने टिकणाऱ्या नवीन कांद्याच्या वाणाचाही त्यांनी भाषणात उल्लेख केला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola