Ajit Pawar: 10वी, 12वीच्या परीक्षेला शाळा न देण्यावर शिक्षण संस्था महामंडळ ठाम ABP Majha
दहावी, बारावीच्या परीक्षेवरुन शिक्षण विभागासमोर मोठा पेच निर्माण झालाय... दहावी बारावीच्या परीक्षेसाठी शाळा न देण्याचा निर्णय शिक्षण संस्था महामंडळानं घेतलाय... महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ आणि अजित पवारांची आज बैठक पार पडली, पण या बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाही... मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत बोर्ड परीक्षेला शाळा न देण्यावर राज्य शिक्षण संस्था महामंडळ ठाम आहे... वेतनेतर अनुदान देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाने अजित पवारांकडे केलीय... तर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेऊ, असं आश्वासन अजित पवारांनी शिक्षण संस्था मंडळाला दिलंय...शिक्षण संस्था महामंडळाने वेतनेतर अनुदान साधारणपणे 600 कोटी रुपयांपर्यंत मिळावे त्यासोबतच पवित्र पोर्टल राज्य सरकारने रद्द करावे, अशी मागणी केली आहे.. या शिक्षण संस्था महामंडळा अंतर्गत जवळपास साडेतीन हजार शिक्षण संस्था येतात... त्यामुळे आता शिक्षण विभागासमोर मोठा पेच निर्माण झालाय...